बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

नवी दिल्ली | टी-20 वर्ल्ड कपचा रंगतदार सामना काल पार पडला. दुबईत रंगेलल्या या सामन्यात पाकिस्ताननं पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करत जोरदार धक्का दिला. या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानं भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज झालेले पहायला मिळत आहे. अशातच या सामन्यातील आणखी एका गोष्टीनं सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधूून घेतलं आहे.

टी-20 सामन्यात अभिनेत्री उर्वशी रोतैलाच्या उपस्थीतीनं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उर्वशीच्या उपस्थीतीमुळे आणखी एकदा भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चांना उधान आलंय. सोशल मीडियावर सध्या उर्वशीचे फोटो व्हायरल होत आहेत.

2018 साली ऋषभ पंत आणि उर्वशीच्या अफेअरच्या चर्चा होत्या. त्यांच्यात ब्रेकअप झाल्यावर ऋषभ पंतनं ऊर्वीशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची माहिती समोर आली होती. पण काही दिवसांपूर्वी उर्वशीनं ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज स्टेडियममध्ये उर्वशीच्या उपस्थितीनं पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा पहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतानं दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्ताननं 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझमनं 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवाननं 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

“ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, समझनेवालों को इशारा काफी होता है”

“आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करायचा”

“काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More