बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तोकडे कपडे घातल्याने फिटनेस माॅडेलला विमानातून खाली उतरवलं!

नवी दिल्ली | फ्लाईटवेळी विचित्र कपडे घातल्याने एका फिटनेस मॉडेलला विमानातून खाली उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे या माॅडेलने स्वतः याबाबतची माहिती तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. या माॅडेलचं नाव डिनेज सॅपिनार असं असून ही 26 वर्षांची आहे.

डिनेज ही तिच्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. तिच्या इन्स्टा आकाऊंटवर मोठ्या प्रमाणात फोटो असून यातील जास्तीत जास्त फोटो बोल्ड अंदाजातच आहेत. तसेच यातील अनेक फोटो बिकनीमध्ये आहेत. मूळची तुर्कस्तानची असलेली डेनिज ही अमेरिकेत राहते. टेक्सास येथे विमानातून प्रवास करताना हा अनुभव आल्याचं तिनं सांगितलं आहे.

डेनिज ही तुर्कस्तानातील एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर आहे. ती काही काळापूर्वी कॅलिफोर्निया येथील लॉस एंजेल्स शहरात आपली बॉडीबिल्डींगमधील कारकिर्द उलगडून सांगण्यासाठी गेली होती. याच प्रवासादरम्यान ती टेक्सास येथील डलास विमानतळावर अडकली. कारण, तिला तिच्या कपड्यांमुळे विमान प्रवासाला मनाई करण्यात आली.

तुर्कस्तानसारख्या जुन्या परंपरांनी जखडलेल्या विचारसरणीच्या देशाला सोडून ती अमेरिकेच्या मुक्त वातावरणात आली होती. मात्र, इथे तिचा भ्रमनिरास झाला आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांनी तिला विमानात बसण्यापासून रोखलं. कारण, तिचे कपडे तोकडे होते. विमान प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना त्या कपड्यांमुळे अवघडलेपण आल्याचं कारण त्यांनी तिला दिलं.

थोडक्यात बातम्या-

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More