देश

मोदींच्या प्रचाराला येणार 5 हजार परदेशी भारतीय स्वयंसेवकांची फौज

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी 5 हजार परदेशी भारतीय नागरिक स्वयंसेवक म्हणून भारतात येण्याची शक्यता आहे. याबाबत हिंदुस्थान टाईम्सनं वृत्त दिलं आहे.

नरेंद्र मोदींना पून्हा पंतप्रधान करण्यासाठी ब्रिटनमध्ये राहणारे 5 हजार भारतीय नागरिक भारतात येणार आहेत. 

आमच्याकडे सुमारे 1 हजार स्वयंसेवकांनी भारतात प्रचारासाठी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे, असं भाजप अनिवासी मित्र संस्थेचे कैलास शेखावत यांनी म्हटलं आहे. यामध्ये डॉक्टर, आय.टी. क्षेत्रात काम करणारे अभियंते आणि वकील स्वखर्चानं सहभागी होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिटनमधून 500 अनिवासी भारतीय मोदींचा प्रचार करण्यासाठी भारतात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

भाषण सुरु असताना मोहन भागवतांवर साधू भडकले, पाहा नेमकं काय घडलं…

हेल्मेट सक्तीविरोधी संतप्त आंदोलकांनी मेधा कुलकर्णींना हुसकावलं

मुख्यमंत्री फडणवीसांना आठवड्यातला आणि महिन्यातला फरकही कळेना! पाहा व्हीडिओ-

गरिब व वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प- नितीन गडकरी

-शहीद पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून पत्नीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या