मुंबई | भाजप पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या प्रवेशानंतर भाजप पक्षाच्या बंडखोर आमदार ‘गीता जैन’ या आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मीरा- भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे गीता जैन यांच्या पक्षांतरानंतर भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे.
गीता जैन यांचा आज दुपारी शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गीता जैन यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामुळे मीरा- भाईंदर या भागातील शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडसे
राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे
मुंबई- सिटी सेंटर मॉलचे दोन मजले जळून खाक; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
“विरोधी पक्षनेत्यांनी आपले वजन वापरुन राज्याला विशेष मदत पॅकेज मिळवून द्यावं”
शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
Comments are closed.