Top News तंत्रज्ञान

4 वर्षात पहिल्यांदाच जिओला धोबीपछाड; ‘ही’ कंपनी बनली नंबर वन!

मुंबई | भारतातील दूरसंचार उद्योगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या रिलायन्स जियोला भारती एअरटेलने मोठा धक्का दिलाय. भारती एअरटेलने मासिक कनेक्शनच्या बाबतीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो मागे टाकलंय.

गेल्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच जियोला इतका मोठा झटका बसला आहे. दरम्यान संपत्ती आणि अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आघाडीवर आहेत.

ट्रायच्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2020 मध्ये भारती एअरटेलने 37.7 लाख नवीन कनेक्शन जोडली आहेत. त्याचबरोबर रिलायन्स जियोने 14.6 लाख ग्राहकांना कनेक्शन दिलेत.

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेनुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचं नेटवर्थ 75 अब्ज डॉलर आहे. तर दुसरीकडे भारती एयरटेलचे फाउंडर सुनील मित्तल 8.12 अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

उर्मिला मातोंडकरांचा आनंद गगनात मावेना; पाहा काय केलंय ट्विट!

कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

‘मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल’, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

“…म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या