बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किस काॅन्ट्रोव्हर्सी’ला विसरुन राखी सावंत आणि मिकानं घेतली गळाभेट, म्हणाले…., पाहा व्हिडीओ

मुंबई | 2006 मध्ये अभिनेत्री राखी सावंत आणि गायक मिका सिंहच्या एका किसमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये, वृत्तवाहिनीवर राखी-मिकाची बातमी प्रकाशित झाली होती. मिकाने त्याच्या वाढदिवशी राखीला जबरदस्ती किस केलं, अशी चर्चा सुरु झाली होती.  त्यानंतर तो अडचणीत आला होता. राखीने मिकाविरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती. तर, मिकाने त्यावेळी स्पष्ट केले होते की राखीने आधी त्याला किस केले.

अशातच आता बॉलिवूडचा सुपरहिट पंजाबी गायक मिका सिंह सध्या कोरोनाकाळात मुंबईतील लोकांना मदत करण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीत आज त्याला चक्क ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतसोबत स्पॉट केले गेले होते. आता पुन्हा या दोघांमध्ये मैत्री झाल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी व मिका दोघेही एकमेकांना मिठी मारताना आणि एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राखी एके ठिकाणी उभी राहून कोल्डड्रिंक घेत  आहे व त्याचवेळी मिकाची गाडी त्या रस्त्यावरून जात होती. राखीला पाहून मिका तिला भेटण्यासाठी येत आहे. मिका जवळ येताच राखी ‘सिंग इज किंग’ असे ओरडू लागते.

दरम्यान, राखी सलमानने आपल्याला मदत केल्याचं सांगते. यावर मिका, मी इकडून जात होतो मात्र राखीला पाहून थांबलो, असे म्हणतो. यावर राखीही आता आम्ही मित्र असल्याचे सांगते. त्यानंतर बिग बॉस फक्त राखीमुळे चालल्याचे मिका सांगतो. यावर राखीदेखील मिका कशी लोकांना मदत करत आहे याचे गोडवे गाताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

पत्नीच्या चारित्र्यावर पतीला आला संशय अन् घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

‘सर माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’; नेटकऱ्याला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More