बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”

मुंबई | माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीले आहे. ज्यात त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहेत. तसेच त्यांना ज्येष्ठ म्हणून वडिलकीचा सल्ला देतो, मानला तर त्यांचाच फायदा आहे असे त्यांनी म्हंटले आहे.

माननीय एकनाथ शिंदे साहेब, आपली मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल मी यापूर्वीच आपले हृद्यापासून अभिनंदन केले आहे. मोगँबो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवले आहेत त्यामुळे तुम्हाला वडिलकीचा सल्ला देतो. किमान फसवणूक आणि नंतर पश्चाताप होणार नाही. ही एक लाख टक्के खात्री देतो. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वपनात देखील विश्वास ठेऊ नका असा सल्ला त्यांनी शिंदेंना दिलाय.

मी कुठलाही स्वार्थ, लाभाची अपेक्षा ठेवली नाही. या (देवेंद्र फडणवीस) नीच, हलकट, पाताळयंत्री, दगलबाज, कपटी, खोटे बोलण्याचे अनन्यासाधारण अंगभूत गुण असलेल्या माणसावर श्रद्धा ठेवली. विश्वास ठेवला. हा माणूस चुकून सुद्धा दगलबाजी करणार नाही, असे मला वाटत होते. परंतु त्यांनी दगा दिला, असं सुरुवातीला पत्रात गोटेंनी म्हटलं आहे.

नंतर तेलगी प्रकरणात आपल्या दुराचारी सरकारचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्या सारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला. त्यांनी त्याबद्दल माफी सुद्धा मागितली नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या माणसापासून सावध रहावं अशी मनोभावना असल्याने आलेला अनुभव आपल्याला सांगितला. तसेच तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरी, प्रमोद महाजन, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांनी कश्याप्रकारे प्रेम आणि जिव्हाळा लावला हे सुद्धा नमुद केले.

थोडक्यात बातम्या –

राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”

बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“एकनाथ शिंदे मुळ शिवसेनेवर दावा करु शकत नाहीत”

मोठी बातमी! शिवसेनेतून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More