बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गजा मारणे प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; माजी खासदार संजय काकडेंना अटक

पुणे | कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याने नियोजनपूर्वक तळोजा कारागृह ते कोथरुडपर्यंत आपली दहशत पुन्हा पसरवण्यासाठी रॅली काढली होती. तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत रॅली काढणारा गुंड गजा मारणे अटकेच्या भीतीने फरार झाला होता. मात्र या रॅलीदरम्यान त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. आता तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

कुख्यात गुन्हेगार गजा मारणे रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

गजा मारणे याने 300 गाड्यांसह मुंबई पुणे महामार्गावर रॅली काढत धुडगूस घातला होता. ही रॅली काढण्याच्या प्लॅनिंगमध्ये सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप काकडेंवर आहे. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांच्या हातावर तुरी देत गजा मारणेने वडगाव मावळच्या न्यायालयात जाऊन अटकपुर्व जामीन मिळवला होता. तेव्हापासून पोलीस गजा मारणेच्या मागावर होते. गजा मारणे फरार झाला मात्र जास्त दिवस तो पोलिसांना गुंगारा देऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावमध्ये गजा मारणेला पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

धक्कादायक! नाशिकमध्ये चक्कर येऊन एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू

तिसरं मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

‘मी देशासाठी मरतोय, पण…’; पत्नीला बेड न मिळाल्याने BSF जवानाचा आक्रोश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More