राजस्थान | माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राजस्थानातील सवाई माधेपूर याठिकाणी त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे.
या अपघातामध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांची गाडी उलटली आहे. मोहम्मद अझरुद्दीन या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबासोबत रणथंबोरला जात होते. यावेळी लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ त्यांची कार उलटली आणि अपघात झाला.
गाडीत अझरूद्दीन यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अझरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात केलं. प्रकृती ठीक असल्याचं समजातच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा”
आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय
“रोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी”
कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..
‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!