बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही, खरा वाघ पहायला अधिवेशनात येणार”

मुंबई | राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सातत्यानं महाविकास आघाडीवर (MVA Government) टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचारी संपाचं (ST Employes Strikes) नेतृत्व करण्यात सर्वात पुढं सदाभाऊ खोत होते. सदाभाऊ खोत यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आगामी काळात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेश पार पडणार आहे.

विधिमंडळ अधिवेशन यंदा मुंबईमध्ये पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे हे सातत्यानं फक्त आपल्या घरी राहून कारभार करतात अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यात वाघाचा एकही गुण नाही. खरा वाघ पहायला आपण हिवाळी अधिवेशनात येणार, असं आव्हान खोत यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

उद्धव ठाकरे आता तरी आपल्या महालातून बाहेर या राज्यात काय चाललंय जरा पाहा. कोरोना आला, मास्क घाला, पळ काढा याला वाघ म्हणत नाहीत, अशी टीका खोत यांनी केली आहे. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. तुम्ही वाघ नाहीत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे खोत बोलत होते. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरूनही त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन हे यावर्षी नागपूरऐवजा मुंबईत होणार आहे. यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये कलगीतूरा रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीच्या कारणानं अधिवेशन मुंबईत होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ घटनेला जबाबदार कोण?; अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण

“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या”

मथुरेत तणावाचं वातावरण, शहरात कलम 144 लागू

शिवसेना काँग्रेसचा हात धरणार का?; संजय राऊतांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

ठाकरे सरकारला मोठा झटका! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More