यवतमाळ | महावितरण कार्यालय पांढरकवडा येथील लेखापालास अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी कानिष्ठ न्यायालयाने 2015 साली माजी आमदार राजू तोडसाम यांना 3 महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती.
आज जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडाने ही शिक्षा कायम केली आहे. यामुळे राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
17 डिसेंबर 2013 ला काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह वीज वितरण कार्यालयात गेले होते, तेथील लेखापाल विलास आकोट यांच्याशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती.
या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.
थोडक्यात बातम्या-
“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”
सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!
सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली!
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य विभागाने केली ‘ही’ मोठी कारवाई!