बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष झरदारी भ्रष्टाचार प्रकरणात दोषी

पाकिस्तान | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते असिफ अली झरदारी यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने पार्क लेन आणि थाटा जलापूर्ती प्रकरणात दोषी ठरवले आहे.

या प्रकरणात झरदारी यांच्यासह अन्य 19 जणांना आरोपी घोषित करण्यात आले आहे. याच न्यायालयाने मागील आठवड्यात झरदारी आणि त्यांची बहिण फरयाल तालपूर यांनाही मेगा मनी लॉण्डरिंग प्रकरणात दोषी ठरवले होते.

दरम्यान, गेल्या वर्षी पाकिस्तानच्या राष्ट्रीय जबाबदेयी ब्युरोने झरदारी यांना अटक केली होती. मात्र त्यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांची उपचारासाठी मुक्तता करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयातही तोंडावर आपटणार- निलेश राणे

“हाथरसच्या निमित्ताने ढोंगी बाया आणि बुवांचे मुखवटे गळून पडले”

विराट कोहलीकडून होणार होती ‘ही’मोठी चूक, वेळीच लक्षात आलं आणि…

बाजीराव की तलवार और अश्विन की मंकडींगपर संदेह नहीं करते; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More