Top News महाराष्ट्र मुंबई

बाईसाहेब जरा धीराने घ्या, अमृता फडणवीसांना माजी पोलिस अधिकाऱ्याचे खरमरीत पत्र

मुंबई |  अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या चौकशी प्रकरणात मुंबई पोलिस विरूद्ध बिहार पोलिस आमनेसामने आले होते, मुंबई पोलिस आम्हाला तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला होता. तर बिहारवरून तपासासाठी आलेल्या एका बड्या पोलिस अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने क्वारन्टाईन करून ठेवलं होतं. त्यामुळे बिहार सरकार विरूद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला. यामध्ये अमृता फडणवीसांनी उडी घेत मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर आता माजी पोलिस अधिकाऱ्याने अमृता फडणवीसांना खुलं पत्र लिहित जाब विचारला आहे. तसंच त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. Former police Officer Visjwas pathak Open Letter To Amruta Fadanvis

आपला उल्लेख करताना माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असाच केला आहे . कारण त्या पलीकडे आपली खास स्वतंत्र ,विशेष अशी ओळख आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही . महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर आपला उदय झाला आहे. तत्पूर्वी आपण केलेले कोणतेही महान कार्य महाराष्ट्रापुढे आले नाही . पत्र लिहिण्यास कारण की, सुशांतसिंग राजपुतच्या प्रकरणात आपण मुंबई पोलिसांवर केलेल्या टिकेबाबत आपल्याशी काही मुद्द्यांवर संवाद साधावा म्हणून हा पत्रप्रपंच.

अमृताबाई, मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल, त्यांच्या किर्तीबद्दल आपल्याला काय आणि किती माहिती आहे? आपला त्याबाबत अभ्यास काय? मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल तुम्ही कुठे २/४ ओळी वाचल्या आहेत का ? की उगाचच उचलली जीभ…… सुशांतसिंगच्या तपासाबाबत ट्वीट करताना आपण लिहिता की, मुंबई सुरक्षित नाही . आणि एकंदरच मुंबई पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही . मुळात पोलिसांचा तपास कसा असतो? काय असतो? तो तपास कसा केला जातो? याबाबत आपल्याला थोडेतरी कायदेशीर ज्ञान आहे का ? याचे उत्तर नाही असेच आहे . पण एक्सेस बँकेत काम करणाऱ्या एक कारकून महिला . आमच्या दृष्टीने जरी कोणी क्लास वन, क्लास टू असला तरी तो कारकुंडाच बरं का. कारण क्लास कोणताही असो शेवटी काम कारकुनाचेच. असो….

कोरोना महोत्सवात आमचे शेकडो पोलीस बांधव शहीद झालेत . जीवावर उदार होऊन दिवसरात्र, उन्हातान्हात , पावसात रस्त्यावर उभे राहून ते जनतेसाठी कर्तव्य करीत आहेत . आणि तुम्ही तुमच्या फिल्मी स्टाईलने पोलिसांना बदनाम करताय . तुमच्या ” फडणवीस ” घराण्यातील कोणी आहे का पोलीस खात्यात ? नाही ना ? कोरोना महोत्सवात शहीद झालेल्या एकातरी कुटुंबाच्या घरी जाऊन तुम्ही त्यांची सांत्वनपर भेट घेतलीत का हो ? त्यांची कुटुंबे कोणत्या अवस्थेत जगत आहेत , जगणार आहेत याचा कधीतरी विचार केलात का? आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून इतके दिवस तुमचा मानसन्मान ठेवला . परंतु ज्या पोलिसांच्या जीवावर तुम्ही दिवसरात्र जीवाची मुंबई करता आणि त्यांनाच नावे ठेवता , त्यावेळी तुमचा मानसन्मान की काय तो ठेवावा की नाही याचा विचार करावा लागतो .

बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या . मागेपुढे पोलीस तुमच्या संरक्षणाला आहेत. याचे भान ठेवा. फुकटच्या संरक्षणात फिरून सुद्धा ही भाषा . बरं नव्ह असलं वागणं .
बाईसाहेब, तुमच्या ह्यांनी म्हणजे देवेंद्रजीनी हो . पाच वर्षे मुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद सुद्धा उपभोगले . पोलीस खात्यासाठी काय केले हो त्यांनी ? पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी काय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या हो त्यांनी? पाच वर्षे गृहमंत्री असताना पोलिसांसाठी त्यांनी केलेली कोणतीही पाच चांगली कामे सांगावीत .
बाईसाहेब , पाच वर्षे म्हणजे फार मोठा कालावधी असतो . परंतु तुमच्या पतीदेवाने या पाच वर्षात गृहखात्यात फतकल मांडून बसल्याशिवाय काहीही केले नाही . ना त्यांनी पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविला , ना त्यांनी पोलिसांच्या विधवा महिलेंचा प्रश्न सोडविला, ना पोलिसांच्या मुलांच्या भविष्यासंबंधी काही प्रश्न सोडविला . काहीही नाही . पती वारल्यानंतर सरकारी घर दोन ते तीन महिन्यात खाली करावे लागते . वाईट परिस्थितीत एखादी विधवा पोलीस महिला आपल्या पतीराजाकडे गेली आणि तिने घरात राहण्यासाठी ५/६ महिन्याची मुदतवाढ मागितली तर ती सुद्धा त्यांना देण्यात आली नाही . सरकारी नियमानुसार काम होईल असे भावनाशून्य उत्तर मिळत असे .

बाईसाहेब, तुम्हाला जर मुंबईत सुरक्षित वाटतच नसेल तर कशाला राहता मुंबईत ? रहा ना तिकडे उत्तरप्रदेश , बिहार मध्ये . तसेही आपल्या पतीदेवाने पाच वर्षे गुजरात साठी, दोन गुजरात्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्रात राहून काम केले . अगदी तसेच तुम्ही बिहारमध्ये जाऊन त्या सुशांतसिंगच्या घराच्या बाजूला घर घेऊन रहा आणि बिहारचे कल्याण करा. बाईसाहेब , एक नम्र विनंती . यापुढे एकही वाकडी तिकडी कॉमेंट पोलिसांविषयी टाकू नका . ज्या क्षेत्रातले आपल्याला काही कळत नाही त्यावर आपण कशाला बोलायचे ? आपले सामाजिक योगदान किती ? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ?? जरा सांभाळून बाईसाहेब . धन्यवाद !
अ‌ॅड विश्वास काश्यप, माजी पोलीस अधिकारी, मुंबई….

महत्वाच्या बातम्या-

या गोष्टीशिवाय कोरोनावर मात करणं अशक्य, अजित पवारांचं परखड मत!

उद्धव ठाकरेंचा पुन्हा ‘चहूमुलखी डंका…’, सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत बेस्ट 5 मध्ये!

कोरोना तर आलाच पण तो एकटा नाही आला तर…., अमेरिकन संशोधनातून चिंताजनक बाब समोर

मायक्रोसॉफ्ट या देशी ऍपमध्ये करू शकते १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक…!

देशात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक रूग्ण….

अखेर प्रतीक्षा संपली..! पुढच्या आठवड्यात रशियामध्ये जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी होणार…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या