पेपर तपासण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांना धमक्या!

मुंबई | मुंबई विद्यापीठांच्या निकालाचा मुद्दा वादात सापडला असतानाच आता विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी पेपर तपासण्यासाठी प्राध्यपकांना धमकावत असल्याचा आरोप होतोय.

मुंबई विद्यापीठाचे माजी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिलीय. ६ तास काम न करणाऱ्या प्राध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं दळवी यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं.

दरम्यान, निकाल लावण्यासाठी प्राध्यापक जीवाचं रान करत आहेत. मात्र विनायक दळवी दुसरीकडे अशी वक्तव्य करत असून त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी हातेकर यांनी केलीय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या