पवार कुटुंबातील 4 सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. यावेळी पवार कुटुंबांतील चौघा जणांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. तर अजित पवार हे शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत चाचपणी करत आहेत. तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून नशिब आजमावण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, पवार कुटुंबीयांनी निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीच्या इतर जागा जिंकण्याची शक्यताही वाढेल, असा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हाथ

-MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप

प्रियांका गांधीच्या रोड शोदरम्यान मोबाईल चोरीला, काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

-युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

Google+ Linkedin