देश

काँग्रेसचे ‘हे’ चार आमदार राजीनामा देणार?

बंगळुरू | विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव आणि बी. नागेंद्र यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. 

या सर्वांविरोधात त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांच्याकडे सोमवारी तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे चारही आमदारांना अपात्र ठरविले जाण्याची भीती आहे. 

ही कारवाई होण्यापूर्वीच ते आपल्या आमदारपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर तो केव्हा स्विकारायचा हा सभापतींचा अधिकार आहे.

दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत या चारही आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“आ देखे जरा किसमे कितना है दम”; ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजपला आव्हान

नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकलं पाहिजे- राहुल गांधी

निवडणूकीआधी 5 कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प

-मोदींनीच अनिल अंबानींना राफेल कराराची माहिती दिली- राहुल गांधी

पवार कुटुंबातील 4 सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या