मुंबई । कोरोना व्हायरस मागच्या दोन वर्षांपासून देशभरात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मात्र मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण आता कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे.
रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणचे आहेत. हे सर्व रुग्ण 19 ते 36 या वयोगटातील असून सर्वजण महिला आहेत. मागील 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
24 तासात देशभरात कोरोना रुग्णांची नोंद 12 हजारांहून अधिक झाली आहे. त्याआधी जर कोरोना रुग्णांची संख्या पहिली तर दिवसही तुलना करता क्रोणबाधितांची संख्या 4 हजारांहून वाढली. म्हणजे जर आता तुलना केली तर कोरोनाबाधितांच्या संख्या 38.4 टक्क्यांनी वाढली. मात्र देशभरात आज 58 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर मागील 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मागील दिवसात 7624 कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. तर या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. तर 24 तासात 12,213 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे आता देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 4,32,57,730 वर येऊन पोहोचली आहे. म्हणजे आतापर्यंत 4,26,74,712 जणांनी कोरोनावर मात केली. आणि 5,24,803 कोरोनामुळे लोकांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या ही 8 हजारांच्या घरात होती, मात्र आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी (15 जून) रोजी काढलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची सांख्य ही आता 8 हजारांहून अधिक झाल्याची नोंद आहे. म्हणून आता कोरोनाच्या वाढत्या रुग्नांवरून चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून आता संपूर्ण देशभरात लसीकरणावर जास्तं भर दिला जात आहे. भारतात आतापर्यंत 1,95,67,37,014 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
थोडक्यात बातम्या-
“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”
प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?; शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं
‘आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो आणि…’; भाजप खासदाराच्या खास शुभेच्छा
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येतबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Comments are closed.