Top News देश

शेतकऱ्यांसाठी फ्री डिझेल; ‘या’ महामार्गावर सुरु आहे खास पुरवठा!

नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून राज्याराज्यातून शेतकरी दिल्लीकडे निघु लागले आहेत.

शेतकरी दिल्लीला जाण्यासाठी निघाले असल्याने त्यांच्या गाडीत फ्रीमध्ये शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते डिझेल भरत आहेत. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आंदोलनात जात यावं.

शिरोमणी अकाली दल हे एनडीएमधून बाहेर पडलं होतं. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठीच शिरोमणी अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला होता. गेले 14 दिवस आंदोलन चालू आहे मात्र कित्येक बैठका होऊनही तोडगा निघाला नसल्याने सर्व बैठका निष्फळ गेल्या आहेत.

दरम्यान, कृषी कायदे मागे घेण्यासाठी सरकार तयार नाही, असं बैठकीनंतर अखिल भारतीय किसान सभेचे नेते हानान मोल्लाह यांनी सांगितलं. आणखी किती दिवस चालणार याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही. कारण शेतकरी पण हट्टाला पेटले आहेत की ‘आर या पार’ काहीतरी निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही.

 

थोडक्यात बातम्या-

“देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

‘शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात’; दावनेंचा अजब दावा

‘खराब रस्ते बनवाल तर…’; नितीन गडकरींचा इशारा

“योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटी उभारण्याबाबत दूरदृष्टी दाखवली, प्रकल्पात सहभागी व्हायला मला आवडेल”

शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार ‘ही’ योजना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या