मुंबई | प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना काल दुपारी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
रेमोवर सध्या कोकिलाबेन रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. रेमोचा खास मित्र व कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान याने रेमोच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले आहेत.
अहमद खान म्हणाला, “हृदयविकाराचा झटक्यानंतर रेमोला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. या सर्व गोष्टी मला फोनवरून सांगण्यात आल्या होत्या. त्यावेळी आम्ही सर्वजण चिंतेत होतो, मात्र आता रेमोची प्रकृती स्थिर आहे.”
“फिटनेसच्या बाबतीत रेमो फार काटेकोर आहे. त्यामुळे त्याच्यासोबत असं घडावं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासालाच मोठा धक्का बसतो,” असंही अहमद म्हणाला.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…
ग्रामपंचायत निवडणुका घोषित; 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान
“महिला स्वतःच्या मर्जीने प्रेमसंबंध बनवून त्यानंतर बलात्काराचा आरोप करतात”
पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!
‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत