बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली | फ्रेंड्स ही मालिका गेल्या 27 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या मालिकेच्या माध्यमातून हलक्याफुलक्या गोष्टी आणि गमतीशीर घटना दाखवून मित्रांचं मित्र प्रेम आणि अनेक विनोदी गोष्टी दाखवल्या जातात. या मालिकेला 1994 साली सुरू करण्यात आलं होतं. तसेच तेव्हा ती एनबीसी या वाहिनीवर दाखवण्यात येत होती.

2004 पर्यंत ही मालिका एनबीसीवर दाखवण्यात आली. त्यानंतर या मालिकेचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं. तरीही त्याचा प्रेक्षकवर्ग अजूनही कमी झालेला नाही. 2002 साली या मालिकेला प्राईम टाईम बेस्ट कॉमेडी मालिकेचा पुरस्कारही मिळालेला आहे.

येणाऱ्या 27 मे ला फ्रेंड्स: द रियुनियन या नावाने या मालिकेचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या मालिकेचा ट्रेलर एचबीओ मॅक्सने प्रदर्शित केला आहे. दरम्यान, संपूर्ण जगभरात या मालिकेचा विविध वयोगटातील प्रेक्षकवर्ग आहे. तसेच गेल्या 27 वर्षांनंतर लोक आजही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती या मालिकेचे जुने पर्व मोठ्या आवडीने आणि उत्सुकतेने बघत असतात.

फ्रेंड्स ही मालिका संपूर्ण जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शिवाय, या मालिकेचा प्रेक्षकवर्ग लहानांपासून मोठ्यापर्यंत असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. पूर्वी यातील सर्व कलाकार हे तरुण असताना त्यांनी याचं चित्रीकरण केलं होतं. परंतु, आता रियुनियनच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Friends (@friends)

थोडक्यात बातम्या –

आमच्या मागे ईडी आली तर खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळतील- गिरीश बापट

‘…तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील”

‘…हे तर आत्मघातकी सरकार’; कोकण दौऱ्यात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

कोरोनामुक्त झाल्यावर शारीरिक संबंध ठेवावे की नाही?, तज्ज्ञांनी दिला हा महत्वाचा सल्ला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More