बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी साहित्य संमेलनावरून नियोजक आणि अध्यक्षांमध्ये पत्रापत्री वाद रंगला

नाशिक | महाराष्ट्राला एक ऐतिहासिक साहित्याची पार्श्वभूमी लाभली आहे. साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची जमीन सुपीक आणि समृद्ध झाली आहे. सध्या मात्र साहित्य संमेलन भरवणाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचं लक्षात येत आहे. साहित्य संमेलनाच्या तारखांवरून सध्या संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

नियोजित संमेलन हे नाशिकमध्ये 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान भरवण्यात आलं होतं. पण नियोजनकर्त्यांनी अचानक तारखा बदलल्यानं ठाले पाटील चांगलेच बरसले आहेत. ठाले पाटील यांनी जातेगावकर यांना पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनाध्यक्ष डाॅ जयंत नारळीकर यांच्या पत्नीच्या तब्येतीचं कारण दाखवत निमंत्रकांनी तारीख बदलली होती.

मंगलताईंच्या तब्येतीबाबत जातेगावकर यांनी ठाले पाटलांना पत्र लिहून कळवलं होतं. परिणामी ठाले पाटील यांनी सुद्धा जातेगावकर यांना पत्र लिहून संमेलन नियोजित तारखेलाच घेण्याबाबत मंगलताईंची आणि आमची चर्चा झाल्याचं कळवलं आहे. परिणामी आता साहित्य संमेलनाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, साहित्य संमेलन अगोदर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ग्राऊंडवर घेण्याचं ठरलं होतं. मात्र आयोजकांनी आता संमेलन भुजबळ नाॅलेज सिटी, आडगाव येथे आयोजित केलं आहे. परिणामी आधीच साहित्यप्रेमींमधून नाराजीचा सुर उमटत आहे. त्यातच आता तारखांचा घोळ घातला जात असेल तर आणखी संभ्रम निर्माण होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

‘जम्मू-काश्मीरमध्ये 3 कुटूंबांची दादागिरी यापुढे बंद’; अमित शहा यांचा जम्मू-काश्मीरच्या नेत्यांना इशारा

समीर वानखेडेंच्या नावानं बनावट ट्विटर अकाऊंट, सर्वत्र खातं कोण चालवतंय याचीच चर्चा

भारतीय संघाला रोखण्यासाठी शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला दिले भन्नाट सल्ले, धोनीला रोखा…

बाबर-रिझवान नव्हे, तर पाकचा ‘हा’ खेळाडू भारताला डोकेदुखी ठरू शकणार???

“आरोग्य विभागातील परिक्षेच्या गोंधळाला राजेश टोपेच जबाबदार त्यांनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More