बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, या महिन्यातील आज 15वी दरवाढ

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतचा किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. त्यातच आता ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच इंधनाचे दर चढतच असल्याचं पाहायला मिळत असल्याने सणासुदीच्या तोंडावर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचं भयावह आणि अस्वस्थ करणारं चित्र निर्माण झालं आहे.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या दरवाढीला मोजता ही ऑक्टोबर महिन्यातील तब्बल 15 वी दरवाढ असल्याचं समोर आलं आहे. इंधनाच्या दरात एवढ्या वेगाने वाढ होत असल्याने सरकारविरोधात नाराजीचा सुर उमटताना पाहायला मिळत आहे. व विरोधी पक्ष मात्र या मुद्द्यावरून वारंवार सरकारला घेराव घालत आहेत.

केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्यासाठी काही ठोस पर्याय किंवा तोडगा काढत नाही. त्यातच आता दररोज वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस पुर्णपणे वैतागला आहे. महागाईने सर्वच सीमा ओलांडल्याने आता यावर कधी नियंत्रण येणार?, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. सध्या पुण्यात पेट्रोल 111.35 रुपये प्रतिलिटर या दराने विक्री करण्यात येत आहे.

इतिहासात पहिल्यांदाच आता डिझेलनेही शंभरी गाठली आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 4.45 रुपयांची दरवाढ करण्यात आली असून डिझेलच्या किंमतीत 5 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या गंभीर विषयावर सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘…यामुळे बॉलिवूड नेहमीच शिक्षा भोगत आलं आहे’, ड्रग्ज प्रकरणात जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य

‘कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा?’, भास्कर जाधवांचा खोचक टोला

ठाकरे सरकारमुळेच कोरोना आटोक्यात, सामनाच्या अग्रलेखातुन संजय राऊतांचा हल्लाबोल

सकाळी-सकाळीच किरीट सोमय्यांच्या ट्विटने उडवली खळबळ, आज दुपारी करणार…

मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More