बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ 

मुंबई | सोशल मीडियावर कायमच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात एखाद्या कलाकाराचा मजेशीर व्हिडीओ असेल तर तो जास्तच पसंतीस पडतो. अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुटींगमधून  वेळ मिळाल्यानंतर प्रत्येक कलाकार आपला छंद जोपासताना दिसतात.

अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा तिच्या या मोकळ्या वेळेचा पुरेपूर वापर करून घेते. कधी ती गाणं गाताना दिसते, तर कधी नृत्य करताना. मात्र, आज गौतमी म्हणजेच तुमची लाडकी सई चक्क क्रिकेट खेळायला मैदानात उतरली आहे. गौतमीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमीच आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते.

सेट असो किंवा खाजगी आयुष्य नेहमीच गौतमी आपल्या अनोख्या अंदाजात दिसते. बऱ्याचदा ती तिच्या गाण्याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेयर करत असते आणि ते व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंत केले जातात. मात्र, नुकताच गौतमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 1 व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये गौतमी क्रिकेट खेळताना दिसत आहे. फक्त क्रिकेट खेळत नाही, तर चक्क चौकार मारत आहे. आणि सोबतच डान्स करून आपला आनंदही व्यक्त करत आहे.

दरम्यान,  बरेच कलाकार मिळेल त्या वेळेत आपले छंद जोपासत असतात. त्यातलीच एक कलाकार म्हणजे गौतमी देशपांडे. ती नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असते. गौतमी सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय असते. ती अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेयर करत असते. तर, गौतमीच्या या व्हिडीओवरून तिला क्रिकेटची आवड असल्याचं समजत आहे.

 

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या –

‘लस घ्या आणि मिळवा मोफत बिर्याणी’; ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी योजना

“मोदीजी आम्ही देशासाठी बलिदान देण्यास तयार आहोत” पाहा चिमुरड्यांच्या हा व्हिडीओ

‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा

कौतुकास्पद! सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डाॅक्टरकडे

ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More