महाराष्ट्र मुंबई

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवी मुंबई | नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव द्या, अशी मागणी मनसेने केली आहे.

या विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. याला मनसेने विरोध केला आहे. नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभे राहत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेने केली आहे.

महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं. मात्र, लोकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावं, अशी मागणी मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केली आहे.

दि. बा. पाटील यांचे नाव द्यायची मागणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करत जे राजकारण केलं आहे, ते निंदनीय आहे, असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

तो स्कूटर घेऊन गल्लीबोळात हिंडत होता; स्कूटरमध्ये निघाली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

“14 वर्षांचा शिवाजी वाचा 54 वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही”

“दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या