बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुख्यात गुंड गजा मारणेला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; पाहा CCTV फुटेज

सातारा | कुख्यात गुंड गजा मारणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर निघालेली मिरवणूक आणि लोकांमध्ये पसरवलेली दहशत यावरून गजा मारणे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. खून, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड गजा मारणे याची नुकतीच 2 खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

कारागृहातून मुक्त झाल्यानंतरही गजा मारणेनं आपली दहशत कायम ठेवण्यासाठी आणखी काही गुन्हे केले आणि त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली. त्यानंतर तो जामिनावर सुटून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याच्या बद्दल अनेक बेकायदेशीर आणि खंडणीचे गुन्हे परत दाखल झाल्याने पोलिस त्याचा शोध घेत होती. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात गजा मारणेला काही काळापुरतं यश मिळालं.

साताऱ्यातील मेढा पोलिसांनी 6 मार्च रोजी अखेर गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वतंत्र तुकड्या गजा मारणे याचा शोध घेत असतानाच साताऱ्यातील मेढा पोलिसांनी गजा मारणेला कसं चित्रपटातील एखाद्या थरारक पद्धतीने पकडलं याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जावळी तालुक्यातून मेढा पोलिसांनी गजानन मारणे याला कशी अटक केली त्याची सीसीटीव्ही रेकॉर्डिंग समोर आली आहे

पाहा व्हिडिओ-

थोडक्यात बातम्या

धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!

थकबाकीदारांची वीज कापणारच; महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या-रजा रद्द

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; ‘या’ तारखेपासून होणार पगारवाढ?

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More