महाराष्ट्र मुंबई

‘इथलेच काय इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात, घाबरायचं नाही’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. गणेश नाईक समर्थक असलेल्या 14 नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेनं नाईक गटाचे नगरसेवक फोडले हे गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागलं आहे.

इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं आहे. गणेश नाईक तुर्भेमधील भाजपच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांन म्हटलंय.

गणेश नाईक यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत, असं शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, नोकरी सोडून घरच्या छतावर करून दाखवली केसरची शेती

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ‘त्या’ मंत्र्याचे फोटो व्हायरल!

“भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल, त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं”

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा…- उदयनराजे भोसले

“पुजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या