Top News देश

50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार; नराधमांनी केलेला प्रकार ऐकून काळजाचा थरकाप उडेल

नवी दिल्ली | झारखंडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. माणूस म्हणून नाही म्हणून तर एखाद्या हैवानाप्रमाणे लोक वागत आहेत. 51वर्षीय विधवा महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार केला आहे. त्यांनी बलात्कारानंतर केलेलं कृत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

चतरातील हंटरगंज भागात ही घटन घडली आहे. गुरूवारी म्हणजे 7 जानेवारीला रात्री अकरा वाजता तिघांनी मिळून विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केला. नराधम इतक्या खालच्या थराच्या माणसिकतेचे होते की ते इतकं करूनच राहिले नाहीत.

पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चहा पिण्याचा स्टिलचा ग्लास घातला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर यातील एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

दरम्यान, पीडित महिलेवर हंटरगंज सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रभारी आरोग्य पदाधिकारी डॉ. वेदप्रकाश यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

‘संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे, यांनी राज्याला बिघडवू नये”

“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही त्यासाठी…”

ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! भारताच्या ‘या’ खेळाडूंवर वर्णद्वेषाची टीका, तक्रार दाखल

‘मुख्यमंत्र्यांनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी सरकारी दवाखान्यांकडे …’; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या