बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

जळगाव | भुसावळ येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून सामुहिक बलात्कार करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित मुलीवर गेल्या अनेक वर्षांपासून आत्याचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित मुलीवर 2018 पासून ते 12 जुलै 2021 पर्यंतच्या कालावधीत आत्याचार करण्यात आला आहे. मुलगी घरात एकटी असताना एका मुलाने मागील दरवाज्याची बाहेरुन कडी लावली तर एकाने आतून कडी लावली. यानंतर तीन जणांनी मिळून तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. यादरम्यान तिचा व्हिडीओ देखील रेकाॅर्ड करण्यात आला. तसेच त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक वर्षांपासून हा अत्याचार सुरु होते.

वारंवार बलात्कार करुन देखील या आरोपींनी तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. यावेळी तिने सर्व घटनाक्रम सांगितला. पोलीस चार आरोपींचा शोध घेत असून यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सुबोध यशोदे असं आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे अल्पवयीन असून अटक करण्यात आलेल्या सुबोधचे वय देखील अवघे 20 वर्ष आहे. तसेच पोलीस आता याबाबत अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

पहिल्यांदा गोळीबार… नेम चुकवून धावत सुटला तर पाठलाग करुन सपासप वार

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More