बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गॅस सिलेंडर पुन्हा महागला, बसणार एवढ्या रुपयांचा फटका

मुंबई | अगोदरच गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती तरी स्थिर राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, आता गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ (LPG Price Hike) झाल्याची माहिती समोर आली आहे. गॅस सिलेंडरमध्ये प्रत्येकी 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ झाल्याने सध्या नव्या दरानुसार, दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2100 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2051 झाली आहे. तर, कोलकातामध्ये 2174.50 रुपये झाला आहे. तर, चेन्नईमध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमंत 2234 रुपये झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुन्हा गॅस 100 रुपयांनी वाढला आहे. 2 महिन्यांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1733 रुपये इतकी होती. ती आता 2100 इतकी झाली आहे. त्यामुळे केवळ 2 महिन्यांच्या कालावधीत गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 467 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती अजूनही स्थिर आहेत. याचा मोठा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More