बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात गॅस गळती; रूग्णांना तातडीनं बाहेर काढलं

मुंबई | दक्षिण मुंबईत असलेल्या प्रसिद्ध कस्तुरबा गांधी रूग्णालयात मोठी दुर्घटना घडली आहे. या रूग्णालयात गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगेचच सर्व कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

सकाळी 11:30 च्या सुमारास घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्य 4 गाड्या तर 3 वाॅटर टॅंकर घटनास्थळी पोहचले आहेत. घटनेनंतर रूग्णालयातील रूग्णांना बाहेर काढलं. ही गॅसगळती तुलनेनं मोठी नसल्यानं कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही.

सकाळी परिसरातील लोकांना गॅसचा वास येत असल्यानं, लोकांनी रूग्णालय प्रशासनला माहिती दिली आणि तात्काळ अग्नीशमन दलाला फोन लावला. एलपीजी गॅस लीक झाल्याचं त्यांनी अग्नीशमन दलाला सांगितलं. त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून गॅस लीक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कार्यक्रम होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच पेडणेकर यांनी कार्यक्रम सोडून घटनास्थळी धाव घेतली.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त; अखेरच्या रूग्णाला मिळाला डिस्चार्ज

लग्न झालं अन् तिसरीनेच धरला नवरदेवाचा हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”

पत्नीनं केलेल्या आरोपांनंतर अखेर हनी सिंगनं सोडलं मौन, म्हणाला…

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ‘ही’ 3 मंदिरे बंद; प्रवेशद्वारातूनही मिळणार नाही दर्शन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More