बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ कोरोनावरील औषधांची अवैध साठेबाजी प्रकरणात दोषी; हायकोर्टाचे कारवाईचे निर्देश

नवी दिल्ली | कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. यातच आता माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरच्या अडचणींत वाढ झाली आहे. औषध नियंत्रक विभागानं गुरुवारी उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या औषध महानियंत्रकांनी गौतम गंभीर फाऊंडेशन कोविड 19 औषधांची अवैध साठेबाजी आणि वितरण प्रकरणात दोषी आढळल्याचं सांगितलं आहे.

‘ड्रग कंट्रोलर’नं न्यायालयात म्हटलं की, फाउंडेशन आणि औषध विक्रेत्यांविरूद्ध वेळ न घालवता कारवाई केली पाहिजे. औषध नियंत्रकांनी हायकोर्टाला सांगितलं की, ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार यांनाही अशाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं आहे.

कोर्टानं ड्रग कंट्रोलरला सहा आठवड्यांत या प्रकरणांमधील प्रगती आणि सद्यस्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी 29 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.

दरम्यान, न्यायालयानं औषध महानियंत्रकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीच्या अहवालात आरोपींना क्लिन चीट देण्यावरून न्यायालयानं औषध महानियंत्रकांवर चांगलेच ताशेरे ओढले होते. तसंच पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 200च्या खाली

सर्वात मोठी बातमी! राज्यातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये सर्व निर्बंध मागे, पाच टप्प्यात होणार अनलॉक

मगरीची शिकार करण्यासाठी वाघाने घेतली पाण्यात उडी अन्…, पाहा व्हिडीओ

पंतप्रधान मोदींचा मेहुलभाई मग देशातून पळाला कसा?, नवाब मलिक यांचा खोचक सवाल

आंदोलन पेटवायला पण धमक लागते, खासदारकी संपत आल्यावर हे सर्व आठवायला लागलं- नारायण राणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More