रितेशचा वाढदिवस बनला स्पेशल, जेनेलियाचं खास गिफ्ट

मुंबई | रितेश आणि जेनेलिया देशमुख हे फिल्म इंडस्ट्रीतलं सर्वात गोड कपल मानलं जातं. यापैकी आज रितेशच्या वाढदिवस. हा वाढदिवस जेनेलियानं खास बनवलाय.

रितेशला शुभेच्छा देताना जेनेलियांना दोघांचा एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. माझं सर्वस्व असलेल्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. शेवटच्या श्वासापर्यंत तू माझा राहशील, असं जेनेलियानं म्हटलंय. 

जेनेलियाच्या या फोटोला लोकांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. आतापर्यंत तब्बल 2 लाखपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो लाईक केलाय. तसेच कमेंटचा देखील पाऊस पडलाय.