महाराष्ट्र मुंबई

कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे

मुंबई | पोलिसांसाठी नोकरीच्या ठिकाणी चांगली घरे मिळाल्यास पोलिसांची कार्यक्षमता वाढेल. त्यासाठी चांगल्या सुविधांनी युक्त अशी जास्तीत जास्त घरे बांधण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ बंगल्यावर पोलिसांच्या घरांच्या संदर्भात बैठक आयोजित केली होती. यात महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंहामंडळाच्या वतीने सादरीकरण करण्यात आलं.

या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व पोलीस महासंचालक बिपीन बिहारी आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी घरे दिली त्या तुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी घरे उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मेहबूब शेख प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी केला मोठा खुलासा

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला ‘ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय

…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येबद्दल पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या