वाॅशिंग्टन | गेल्या वर्षभरापासून सर्वांनाच मास्क लावून फिरावं लागत आहे. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. अमेरिकेमध्ये लसीकरणानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना लशीचे डोस अमेरिकेत दिले जात आहेत. त्यानंतर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 8 कोटी 7 लाख लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या 25 टक्के आहे. एकूण लस घेतलेल्यांपैकी फक्त 77 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.00005 टक्के इतकं दिसून आलं आहे. लस घेतल्यानंतर 10 लाख व्यक्तींपैकी केवळ 3 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं होतं. तसेच लसीकरणानंतर लक्षणं दिसून येण्याचं प्रमाण देखील 0.0005 टक्के आहे.
सध्या अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच आता ज्यांनी कोरोनावरील लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. त्यामुळे लसीकरणामुळे अमेरिकेला मोठा फायदा झाल्याचं दिसून येतं आहे. अमेरिकेत सध्या 25 टक्के लोकांचे लसीकरण झालं आहे. त्यामुळे अमेरिकेत लवकर परिस्थिती आटोक्यात येऊ शकते.
दरम्यान, इस्राईल या देशात आता नागरिक मुक्तपणे फिरू शकतात. या देशात आता एकही कोरोना रूग्ण नाही. या देशाने एकजुटीने कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर आता या इस्राईलमध्ये देखील मास्क घालण्याची सक्ती करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!
“देशातील जनतेला मूर्खात काढलं जातंय, सरकारविरोधात जनतेने बंड पुकारलं पाहिजे”
कोरोनाने मुलगा हिरावला, 15 लाखांची FD मोडून मेहता दाम्पत्याने केली कोरोना रूग्णांना मदत
“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत?”
काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन
Comments are closed.