अनुष्कासारखी जोडीदार मिळणं यापेक्षा मोठं भाग्य नाही- विराट कोहली
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. या दोघांचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ असेल तो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतो. अशातच आता विराटचा मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इग्लंड टेस्टपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विराटला अनुष्काविषयी विचारलं असता विराटनं सांगितलं की, मी आज जो काही आहे त्याचं सगळं श्रेय अनुष्काला जातं. अनुष्कामुळे माझ्यामध्ये भरपूर बदल झाला आहे. मला वाटतं ते दिसूनही येतं, क्रिकेटमधूनही ते जाणवतं. अनुष्का माझी जोडीदार आहे यापेक्षा मोठं भाग्य नाही.
या मुलाखतीदरम्यान दिनेश कार्तिकनं विराटला त्याच्या आणि अनुष्काच्या पहिल्या भेटीच्या अनुभवाविषयीही विचारलं. अनुष्का आणि मी एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी एकत्र आलो होतो, असं विराट म्हणाला. याशिवाय माझ्यात आलेल्या बदलांवमध्येही अनुष्काचा मोठा हात आहे, असंही यावेळी विराटनं म्हटलं.
दरम्यान, विरुष्काला सहा महिन्यांची मुलगी आहे. तीही सध्या विराट अनुष्कासोबत इग्लंड दौऱ्यावर आहे. अजूनपर्यंत त्यांनी वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना वामिकाच्या पहिल्या झलकची उत्सुकता लागून आहे.
थोडक्यात बातम्या –
एचडीएफसीच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीवर बॅंकेनं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
अडचणीच्या काळात सचिन तेंडूलकरनं मला मदत केली – विराट कोहली
प्रशांत किशोर यांनी दिला मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा!
7 मुलांच्या 67 वर्षीय बापाने केला 19 वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह, केली ‘ही’ मागणी
‘झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका’; आरोग्यमंत्री राजेश टोपेेंचं जनतेला आवाहन
Comments are closed.