“पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले चर्चेत आहेत. सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत विक्रम गोखले यांनी त्यांच्या पुढील वाटचालीबाबत वक्तव्य केलं आहे. पुढील आयुष्यात तरूणाला मार्गदर्शन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
विक्रम गोखले यांनी यावेळी बोलताना, मोठ्या कलेला आपण विसरत चाललो आहोत. या सगळ्यांचा कधी कधी त्रास होतो परंतू त्रास करून घेण्याचे माझे वय नाही. मी आता काम हळुहळू कमीच करतोय. किती काम करायचे, थांबायला पाहिजे ना कुठेतरी. मात्र, ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्यांना मी शिकवतो. जी शिकवण्याची शाळेची, कॉलेजची पद्धती आहे त्याप्रमाणे शिकवतो, असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.
पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत. ज्याला काहीच अर्थ नाही. अंर्तमुख करणारे सिनेमे, नाटक पाहायला हवे, असं त्यांनी सांगितलं. मनोरंजनाचा हेतू आधी साध्य होतोय का? ते ठरवा. घाल पीठ, घाल पाणी, अशी मालिकांची अवस्था आहे, अशी टीका विक्रम गोखले यांनी केली आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या डिजिटलीकरणावरूनही विक्रम गोखले यांनी भाष्य केलं आहे. सामान्य माणसाची दु:ख सोडून आपण नाचगाणी, भांडण, बलात्कार, गुंडगिरी, राजकारणी एवढेच आपण पाहत आहोत. समाजाची सुख दु:ख त्यावर कोणी भाष्य करत नाही. डिजिटलीकरणामुळे संवेदना आणि संवेदनशीलता दूर होत आहे, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
IPL 2022: ‘या’ स्टेडिअमवर रंगणार यंदाचे Playoff चे सामने?
Budget 2022: सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर – रामनाथ कोविंद
Budget 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी – नरेंद्र मोदी
कोरोना व्हायरसच्या लढाईत आता ‘ही’ लस ठरणार गेमचेंजर
तुमचं वजन वाढतयं का?, वजन कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा
Comments are closed.