बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

नवी दिल्ली |  काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली होती. त्या दिवसापासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेनाच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला. त्यावरून नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं आहे.

आज नाना पटोले काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. त्यांची भेट घेण्यापूर्वी पटोलेंनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सामनामधून काँग्रेसवर करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं होतं. सामनावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. कारण मी सामना वाचत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

आम्हाला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच ते पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं म्हणत पटोले यांनी टीका करणाऱ्यांना एक प्रकारे सूचक इशाराच दिला आहे. तसेच कुणी काय टीका करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतू सतत त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जात असेल, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा केला पाहिजे, असं पटोले म्हणाले.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखात काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचं आहे आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही, असं राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे. पण पक्षातून डरपोक कार्यकर्ते जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे का?, असा सवालही करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत WHOचा सावधानतेचा इशारा!

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे झारीतले शुक्राचार्य”

धक्कादायक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंटची लागण

पुण्यातील ‘त्या’ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, नगरसेवकाचं नाव आल्यानं खळबळ

व्हॉट्सअप चॅटमधून राज कुंद्राच्या ‘या’ धक्कादायक गोष्टी आल्या समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More