पुणे महाराष्ट्र

‘छोटा पुढारी’ घनश्याम दरोडेने ‘सत्तापेच’ सोडवण्यासाठी सुचवला ‘हा’ उपाय!

अहमदनगर | तुमच्याकडून सरकार स्थापन होणार नसेल तर जनतेतून एखादा मुख्यमंत्री बनवा, असा सल्ला छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने दिला आहे. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरुन सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींनवरून सर्वच राजकीय पक्षांचा समाचार घनश्यामने घेतला.

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तुमच्या भांडणात शेतकरी मरतोय, आज याच्याकडे तर उद्या त्याच्याकडे तुमच्या बैठका सुरु आहेत. मात्र हे सर्व दूर ठेऊन आधी सरकार स्थापन करा, असं घनश्यामने राजकीय पक्षांना सुनावलं आहे.

राज्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. शेतकरी भरडला जात आहे. तुम्ही सरकार स्थापन करुन योग्य निर्णय घेतला तर बरं होईल, असंही घनश्याम म्हणाला.

दरम्यान, तुम्ही आपापसात राजकारण करत बसू नका. कोणीही या आणि सरकार स्थापन करा आणि कर्जमुक्ती करा, असा सल्ला त्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-  

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या