हॅलो… मी ढिगाऱ्याखाली अडकलोय, मला बाहेर काढा!

मुंबई | घाटकोपर इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राजेश दोषींच्या मुलाचा फोन मध्यरात्री वाजला. पाहतो तर आपल्या वडिलांचा फोन होता. फोन उचलताच, आपण ढिगाऱ्याखाली सुखरुप असल्याची माहिती राजेश यांनी दिली तसेच आपल्याला लवकर बाहेर काढा, असंही सांगितलं. 

राजेश यांच्या मुलानं ही माहिती प्रशासनाला कळवली. त्यानंतर रात्री दीड वाजता एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्नाने दोषींना बाहेर काढलं.

१५ तासांनंतर राजेश दोषी सुखरुप बाहेर आले. त्यांना शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.