पुणे महाराष्ट्र

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

पुणे | देशात अशांतता निर्माण करण्याचे काम राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षांकडून सुरु आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यायला हवं, अशी टीका पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश बापट बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केलं.

मुंबईत होत असलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी देखील अशाच कायद्याचे विचार अनेकवेळा मांडलेले आहेत. आता मात्र तेच त्यांच्या मूळ विचाराला विरोध दर्शवित आहेत. जे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. तेच आम्ही मांडत आहोत. त्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागेल, असं गिरीश बापट म्हणाले.

केंद्र सरकारने केलेल्या कायदा कुठल्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नसून त्यात काही सुधारणा केल्या जातील. तसंच कायदा मागे घेतला जाणार नाही यावर सरकार ठाम आहे, असं गिरीश बापट यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

आठवले माफी मागा!; शेतकरी आंदोलनावरील वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं; रामदास आठवलेंचा सल्ला

देशातला सर्वसामान्य माणूस कायदा आणि तुम्हाला दोघांनाही उद्ध्वस्त करणार- शरद पवार

गुदगुल्या करणं जीवावर बेतलं; दोन मित्रांच्या मृत्यूनं खळबळ

“मोर्चात खरे शेतकरी कमी आणि घुसवलेले लोक जास्त”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या