Top News पुणे महाराष्ट्र

लॉकडाऊनबाबत अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा….; गिरीश बापट आक्रमक

पुणे | उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर, पुणे जिल्हा तसंच पिंपरी-चिंचवमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या निर्णयाला पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी विरोध केला आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध करत बापट यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं. तसंच ते एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. ते म्हणाले, “पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नाही. हम करे सो कायदा असून हे बरोबर नाही.”

“केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं आहे. असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू”, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी उपायोजना करायला हव्यात. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही, असं बापट म्हणाले.

4 टक्के रूग्णांसाठी संपूर्ण शहराला वेठीस धरणं हे बरोबर नाही. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासत घ्यायला हवं, अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय फरक आहे?, शरद पवारांनी ठेवलं अचूक बोट!

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या