बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”

पुणे | नाशिक येथे सध्या सुरु असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर Girish kuber) यांच्यावर शाईफेक करण्यात आली. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ ‘Renaissance State’ या पुस्तकामधील लिखाण वादग्रस्त असल्याचं म्हणत सध्या राज्यभर निषेध करण्यात येत आहे. यावरच आता संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश कुबेर यांच्या Renaissance of State या पुस्तकाचा सार पाहता लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संघर्षाच्या काळात मस्तानी प्रेमात अडकलेला बाजीराव पेशवा श्रेष्ठ होता आणि याचाच संदर्भ पकडून ते आजच्या राजकारणात शरद पवारांपेक्षा फडणवीसांची श्रेष्ठता मांडताना दिसतात, असं प्रविण गायकवाड यांनी म्हटलं आहे.

गिरीश कुबेर आपल्या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांना देशाचे भावी पंतप्रधान संबोधतात. छत्रपती शिवरायांची तुलना बाजीरावाशी करून शरद पवार यांची तुलना फडणवीस बरोबर करण्याची क्लुप्ती या पुस्तकातून दिसून येते जी ब्राह्मणी वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच मांडलेली आहे, असंही प्रविण गायकवाड यांंनी म्हटलं.

पुढे प्रविण गायकवाड यांनी म्हटलं की, गिरीश कुबेर हे लोकसत्ता सारख्या मराठी वृत्तपत्राचे संपादक असतानाही हे पुस्तक इंग्रजीतूनच का लिहितात कारण जगामध्ये इंग्रजी ही ज्ञानभाषा मानली जाते, इंग्रजी मध्ये लिहिले गेलेले पुस्तक हे प्रमाण मानले जाते. जेम्स लेनने ही Shivaji The Hindu King in Islamic India हे पुस्तक इंग्रजीतूनच लिहिले होते. इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीत करून खोटा इतिहास शिवप्रेमींच्या माथी मारण्याचे हे एक षडयंत्र आहे.

थोडक्यात बातम्या – 

आरोग्य विभागाचं टेंशन वाढलं; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…

ओमिक्रॉनचे रूग्ण सापडताच पुणे प्रशासन सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More