Top News महाराष्ट्र मुंबई

गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णींची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई |  पुण्यात कोथरुड भागात सकाळच्या सुमारास रानगवा रस्ता चुकून आला होता. त्याला पाहण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दी, गोंगाटामुळे तो भांबरला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबद्दल सोशल मीडियावर उत्सुफुर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आपण फार हिंस्त्र होत चाललो आहोत, असं म्हणत गिरीश कुलकर्णींनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

एखादा माणूस रस्ता चुकून गावात आला, लहान मूल घर चुकून आजूबाजूला गेलं, तर आपण लगेच शोधाशोध करून त्याला रस्ता दाखवतो. त्याला त्याच्या घरी सोडतो. चुकलेला प्राणी जर आपल्याकडे आला तर त्याला कशी वागणूक द्यावी, याबाबत माणसाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. माणसाने संवेदनशील बनवण्याची गरज निर्माण झाली असल्याचं गरीश कुलकर्णीं यांनी सांगितलं.  बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आपण फार हिंस्त्र होत चाललो आहोत. आमच्या कुतूहलापोटी, आमच्या उत्सुकतेपोटी, आमच्या हव्यासापोटी आपण हिंस्त्र होत आहोत. लोकांनी गर्दी केली आणि त्याला पळवलं. अशा स्थितीत रागनवा मेला याचं नवल नाही. उलट तो मेला म्हणून सुटला असं म्हणावं लागेल. नाहीतर आपण कसंही त्याला मारलाच असता, असं कुलकर्णींनी म्हटलं आहे.

दरम्यान, गवाच काय माणूसही सध्या घाबरलेला आहे. भयावह वर्तमान आहे. शहर माणसाला भीती घालतं. दडपून टाकतं. माणसाची ही कहानी आहे. मग या परिस्थितीत मुक्या जंगली प्राण्याचा काय चालेल?, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल- बच्चू कडू

‘आम्ही शिर्डीत जाणारच…’; नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा

“जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलंय, ते सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत”

धक्कादायक! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन!

“रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या