बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभाव”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीनं (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यात सर्वत्र खळबळ माजली आहे.

संजय राऊत यांच्यावर झालेल्या मोठ्या कारवाईनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाजपा नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभावच असल्याची टीका गिरीष महाजन यांनी केली आहे. राऊत यांनी आतापर्यंत जे काही आरोप केले त्यातील एकही खरा ठरला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

CNG गाड्या वापरणाऱ्यांना मोठा झटका, ‘ही’ महत्त्वाची बातमी आली समोर

कोरोनाच्या नव्या लक्षणाविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…

Health| पोटात गॅस तयार झाल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय

गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

मशिदींवरील भोंगे उतरवणार का?; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More