Top News

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही- गिरीश महाजन

जळगाव | राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यावर माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजनांनी भाष्य केलंय.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात ठाकरे सरकारने नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, निकषानुसार राज्यपाल त्यांची निवड करतील, असं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळत हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

दरम्यान, माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘माणुसकीचा फ्रीज’, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा उपक्रम

“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”

‘… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल’; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा; अतुल भातखळकर यांची मागणी

“पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिराग पासवान यांचं वर्तन संशयास्पद”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या