महाराष्ट्र मुंबई

पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा- गिरीश महाजन

मुंबई | शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा, अशी बोचरी टीका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. त्याचं खापर भाजपवर फोडलं जातंय, असा आरोप गिरीश महाजनांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीत ज्यांना भविष्य दिसत नाही. ते लोक पक्ष बदलतात. आगामी काळात शरद पवारांकडे एक आकडी संख्या असणारे लोकही राहतात की नाही याकडे त्यांनी पाहावं, असा हल्लाबोल महाजनांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या आमदारांना फोन केला हे पवारांनी दाखवून द्यावं, असा सवालही यावेळी महाजनांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!

-पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

-‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

-“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या