Top News महाराष्ट्र मुंबई

“सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी आम्ही त्यांना…”

मुंबई | जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं वक्तव्य राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते आणी माजी मंत्री गिरीष महाजनांनी सत्तारांना टोला लगावला आहे.

सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. टीव्ही9 शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अब्दुल सत्तार हे युतीतून निवडून आले आहेत. याचं त्यांनी भान ठेवावं. रावसाहेब दानवे यांचं काम मोठं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केलं आहे. त्यामुळे सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असं, महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गिरीष महाजनांच्या या टोल्यावर सत्तार काय बोलतात हा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“शेलारांना भाजपमध्ये सध्या काय किंमत आहे हा संशोधनाचा विषय”

“शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट फक्त 21 हजार 900 कोटी, तर मोदींच्या काळात…”

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही, शेतकऱ्यांना पैसे नकोत न्याय हवाय- सुप्रिया सुळे

पुण्यात मनसेचं खळखट्याक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन फुटलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या