बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्टाॅयनिसने खेचला 104 मीटर सिक्स, अन् गर्लफ्रेंडला इशारा करत…; पाहा व्हिडीओ

मुंबई |  आयपीएल 2022 मध्ये दररोज रोमांचकारी सामने पहायला मिळत आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दरम्यानचा सामना देखील असाच रंगतदार झाला. लखनऊचा संघ तीन विजयासह गुणतालिकेत अव्वल चार संघात आहे. तर मुंबईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

लखनऊ संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केल्यानंतर मुंबईचा हा निर्णय केएल राहूलनं चुकीचा ठरवला आहे. इतर फलंदाजांना सोबत घेऊन राहुलनं तब्बल 199 धावांचं विशाल लक्ष्य उभारलं. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज मार्कस स्टाॅयनिसनं फलंदाजीला उतरल्यावर कमालीचा 104 मीटर भारी सिक्स मारत सर्वांना अचंबित केलं.

स्टाॅयनिसचा षटकार पाहून मैदानात उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू आलं. सामना पाहण्यासाठी उपस्थित स्टाॅयनिसची गर्लफ्रेंड देखील कमालीची खुश झाली होती. स्टाॅयनिसनं तिच्याकडं पाहताच दोघांनीही स्मित हास्य दिलं. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडिवर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, लखनऊ संघानं हा सामना 18 धावांनी जिंकला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या सहा सामन्यात पराभूत झाली आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल

मनसेचा भोंगा, सेनेला धोका! संजय राऊत म्हणाले, “आमचा अयोध्या कार्यक्रम ठरला”

‘हिमायलात जाईन’ म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट बूक!

‘देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर…’; नवनीत राणांचं शिवसैनिकांना सडतोड उत्तर

“भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, तरीही त्यांनी परंपरा पाळली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More