बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमच्या ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या”

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. अशातच बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कारणांमुळे देशात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यु होत आहे. कोरोना महामारीला आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं आहे. तरी देखील ही महामारी थांबत नसल्याने अनेकांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनी देखील पंतप्रधान मोदींवर संतापजनक एक ट्विट केलं आहे.

राम गोपाल वर्मा हे तेलगु आणि बाॅलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांच्या चित्रपटांसारखं त्यांच्या विचारांना देखील लोक तेवढाच प्रतिसाद देतात. अशातच राम गोपाल यांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना टॅग करुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून राम गोपाल वर्मा यांनी दोघांवरही जोरदार टिका केली. यादरम्यान त्यांनी मोदींवर टिकास्त्र सोडत आपण हाॅरर चित्रपटांची निर्मिती करणारा साधा निर्माता आहे, मात्र मला तुमच्या नवीन चित्रपट ‘तिसरी लाट’ मध्ये स्पाॅटबाॅयचं काम द्या, असं म्हटलं आहे.

राम गोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये राम गोपाल वर्मा यांना मृतदेह मोजण्याच्या डिपार्टमेंटला क्लर्कचं काम द्यावं, अशी विनंती केली आहे. एवढंच नाही तर नरेंद्र मोदींना जेवढे मृतदेह आवडतात तसेच राम गोपाल वर्मा यांना देखील आवडत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत 2014 मध्ये मोदींना ‘मौत का सौदागार’ असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, त्यांच्या इतकी दुरदृष्टी होती हे आपल्याला कधीच कळालं नसून डिजीटलद्वारे आपले पाय पाठवावे जे धरुन क्षमा मागता येईल, असं देखील गोपाल यांनी रोखठोकपणे म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, भाजप हारला कोरोना जिंकला”

मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

तामिळनाडूत कोणी केला कमल हसन यांचा पराभव?

#सकारात्मक_बातमी 20 टक्के फुफ्फुस काम करत असताना देखिल महिलेची कोरोनावर मात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More