बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडातले हजारो कोटी मृतांच्या नातेवाईकांना द्या”

मुंबई | महामारी म्हणून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. या संकटकाळातही अनेकांनी व्यापार केला. लसीकरणातून हजारो कोटींचा नफा कमावलाच. पंतप्रधान केअर फंडातही हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा वापर मृतांना मदत म्हणून कसा करता येईल हे पाहायला हवं, असा सल्ला शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला दिला आहे.

कोरोना बळींच्या वारसांना आर्थिक मदत देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असं सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं आहे. कोरोना ही आपत्ती आहेच. ती राष्ट्रीय की नैसर्गिक हे सरकारने एकदा ठरवलं तर बरं होईल. सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन केलंच आहे. जनतेला दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारचंच आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

लाखो लोक मेले, तितकेच अनाथ आणि निराधार झाले. कोरोना युद्धात अनेक डॉक्टर्स, शिक्षक, सरकारी पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले आहेत. असंख्य पत्रकार या संकटांचे वार्तांकन करताना मरण पावले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या मलमपट्टीने जखमेचा घाव भरायला मदत होईल. माणुसकीचा धर्म हेच सांगतो, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यातील विरोधी पक्ष सक्षम व जागरूक आहे. त्यांनी पंतप्रधानांना भेटून किंवा पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त कुटुंबास मदत करावी असं नम्रपणे सांगायला हवं, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

डेल्टा प्लस व्हेरिअंटबाबत WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली ‘ही’ दिलासादायक माहिती

मराठा आरक्षणाच्या या 5 मुद्द्यांचा न्यायालयाने एकदाचा निकाल लावून टाकला, पण आता पुढे काय?

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’; अजित पवारांचा इशारा

न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

…आता केंद्र सरकार कमी पडलं असा आरोप आम्हाला करायचा नाही- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More